शिरगावात कडक पोलीस बंदोबस्त : सर्व सीमा सील, कडक पहारा : व्रतस्थ धोंडगणांचे सोवळे व्रत अंतिम टप्प्यात
रविराज च्यारी / डिचोली
आपल्याला मोठय़ा बहिणीने उच्चारलेल्या अपशब्दाला हस्तक्षेप घेताना आपण अग्निदिव्यातून मार्गक्रमण करणार, असा पण केलेल्या शिरगावातील देवी लईराईचा पण म्हणजेच आज होणारी तिची ही प्रसिद्ध जत्रा. जत्रोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे सर्वात उंच होमकुंड आणि पहाटे या होमकुंडाच्या रखरखत्या निखाऱयांवरून मार्गक्रमण करणारे असंख्य धोंडगण आणि अखेरी देवी लईराईच्या कळसाचे होमकुंड मार्गक्रमण… या संपूर्ण सोहळय़ाला यावषी असंख्य धोंडगण व भाविक मुकणार आहेत. यावषी देवस्थान समितीच्या आवाहनाला मान देऊन असंख्य धोंडगणांनी आपले व्रत घरातच पाळणे पसंत केले आहे. त्यामुळे आज घराघरातून देवीचे नामस्मरण व जयघोष घुमणार आहे.
देवी श्री लईराईचा प्रसिध्द जत्रोत्सव आज मंगळ. दि. 28 एप्रिल रोजी असून राज्यात लागू असलेल्या लॉकडाउनमुळे देवीचे मंदिर बंदच रहणार आहे. देवीच्या असंख्य व्रतस्थ धोंडगण व भाविकांनी शिरगावात प्रवेश करू नये यासाठी शिरगावातील सर्व रस्ते, वाटा बंद करण्यात आल्या असून गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज जत्रोत्सवाच्या दिवशी शिरगावात बंद असतानाही लोकांची गर्दी होण्याची शक्मयता लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस फौज शिरगावच्या सर्व प्रवेशद्वारांवर तैनात करण्यात येणार आहे.
प्रथम जत्रोत्सवाच्या दिनी शिरगावात शांतता
कोरोना प्रतिबंधक लॉकडाऊनमुळे इतिहासात प्रथमच शिरगावात देवी लईराईच्या जत्रोत्सवदिनी शिरगाव पूर्णपणे शांत दिसून येणार आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे सध्या संपूर्ण राज्य लॉकडाऊन असल्याने शिरगावातील ही प्रसिद्ध जत्रा रद्द करताना देवीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने जाहीर केला आहे. देवीच्या असंख्य धोंडगणांना आपापल्या घरातच राहून देवीचे सोवळे व्रत पाळण्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनाला मान देताना सर्व धोंडगणांनी आपापल्या घरीच किंवा अंगणात हे सोवळे व्रत पाळले.
धोंडगणांचे सोवळे व्रत अंतिम टप्प्यात
जत्रोत्सवाच्या तीन दिवस पूर्वी संपूर्ण राज्यात देवीच्या भक्तीभावाने उपासना करणारे देवीचे असंख्य धोंडगण कडक सोवळे व्रत पाळतात. धोंडगणांच्या वास्तव्याच्या ठिकाणी जत्रेच्या आदल्या दिवशी धोंडगणांचे ‘व्हडले जेवण’ आयोजित केले जाते. त्यानंतर जत्रेच्या दिवशी हे सर्व धोंडगण केवळ फराळच ग्रहण करतात. आज जत्रेचा दिवस असल्याने या धोंडगाणांचे सोवळे व्रत अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
अनेक ठिकाणी व्हडले जेवण नाही
लॉकडाऊन काळामुळे अनेक ठिकाणी जमावाने वास्तव्य करणाऱया धोंडगणांच्या या पारंपरिक कार्यक्रमावर गदा आली आहे. त्यामुळे धोंडगणांच्या व्हडल्या जेवणाला अनेक भाविक मुकले आहेत. तरीही काही घरांमध्ये किंवा अंगणात या लॉकडाऊन काळातील सर्व नियम व अटी पाळून वास्तव्य करणाऱया धोंडगणांतर्फे मर्यादित प्रमाणात लोकांना व्हडले जेवण वाढण्यात आले. या जेवणाचा यावषी मोठय़ा संख्येने नाही, तर अल्प संख्येने लोकांनी सामाजिक सुरक्षा अंतर सांभाळत आस्वाद घेतला.
डिचोलीचे मामलेदार तथा देवस्थान प्रशासक प्रवीणजय पंडित यांनी सोम. दि. 27 रोजी शिरगावात सध्या अडविण्यात आलेल्या सर्व रस्त्यांची पाहणी केली. पोलिसांना गावातील सर्व नाकाबंदी करण्यात आलेल्या प्रवेशद्वारांवर कठक पहारा देण्याची सूचना केली. यावषी ही जत्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने गावातील लोकांची निराशाच झाली आहे.