प्रतिनिधी/ सातारा
मोळाचा ओढा, सैदापूर परिसरातील आदर्श घरकूल येथे दोन महिलांनी घरात घुसून 1 लाख 61 हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले असल्याची तक्रार एका महिलेसह तिच्या मुलीवर दाखल झाली आहे. दरम्यान ज्यांच्यावर चोरीचा आरोप केला त्या महिलेने देखील तिला चोरीचा आरोप केलेल्या महिलेने मारहाण केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार सरस्वती मंगेश मोहिते वय 51 रा. आदर्श घरकूल, मोळाचा ओढा, सातारा यांच्या तक्रारीनुसार दि. 28 रोजी वैशाली संतोष सुपलेकर व त्यांची मुलगी (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) या दोघींनी सरस्वती मोहिते यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी दोघांनी घरातील 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन चोरुन नेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांवर गुन्हे दाखल केले असून हवालदार पाटोळे अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, वैशाली संतोष सुपलेकर (वय 44 रा. आदर्श घरकूल, मोळाचा ओढा सातारा) यांनी अजिंक्य मोहिते यांची आई (नाव, पत्ता माहिती नाही) यांनी सुपलेकर यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केली असल्याची तक्रारी दिलीय. दि. 28 रोजी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले असून याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे