एका नियमामुळे ब्रिटिश दांपत्याचे बदलले जीवन
ब्रिटनमध्ये एका दांपत्याला घरातून बाहेर पडणे अवघड ठरले आहे. पती-पत्नी स्वतःच्या घरातून बाहेर पडल्यास त्यांना 12.50 पाउंड म्हणजेच 1248 रुपयांचा युएलईझेड दंड भरावा लागतो. या व्यवस्थेमुळे हे दांपत्य अत्यंत नाखुश आणि नाराज आहे, कारण आतापर्यंत अनेकवेळा त्यांना दंड भरावा लागला आहे.
जॉर्ज आणि वेरा डोलवर यांचे घर एल्थाममध्ये ‘लो इमिशन झोन’ सीमेवर स्थित आहे. याचा अर्थ जेव्हा कधी ते स्वतःच्या जुन्या कारद्वारे घरानजीकचा ट्रफिक लाइट ओलांडतात, तेव्हा त्यांना रोख स्वरुपात दंड भरावा लागतो.
मागील महिन्यात युएलईझेडचा विस्तार झाला होता. लंडनमध्ये निर्माण करण्यात आलेला युएलईझेड (अल्ट्रा लो इमिशन झोन) एक असे क्षेत्र आहे, जेथे ‘अधिक प्रदूषण फैलावणाऱया वाहनां’ना चालविल्यास दंड भरावा लागतो. याचमुळे जॉर्ज यांना नव्या वाहनाकरता 40 हजार पाउंड खर्च करणे भाग पडले आहे. तर त्यांची पत्नी वेराने स्वतःच्या जुन्या वाहनांना घरात कैद केले आहे. ही वाहने युएलईझेडचे निकष पूर्ण करत नाहीत.
जॉर्ज आणि त्यांची पत्नी दक्षिणपूर्व लंडनमधील स्वतःच्या घरात 32 वर्षांपासून राहत आहेत. युएलईझेडचे नियम बदलल्यावर त्यांचे घर याच्या सीमेवर आले. सादिक खान यांच्यामुळे मी कारकरता सुमारे 40 हजार पाउंड खर्च केले आहेत. मला एक कार खरेदी करावी लागली असून एका नव्या व्हॅनसाठी 7 हजार पाउंडचा खर्च करावा लागल्याचे जॉर्ज म्हणाले.
लोक अद्याप स्वतःच्या जुन्या वाहनांचा वापर करत आहेत. अशा स्थितीत हवेची स्थिती तशीच राहणार आहे, हा विषय केवळ पैशांसाठीचा आहे. येथील हवा आणि ट्रफिक लाइटच्या दुसऱया बाजूकडील हवेत काय फरक आहे. मी हजारो लोकांप्रमाणेच धूरामध्ये मोठा झालो असल्याचे जॉर्ज यांनी म्हटले आहे.