अध्ययनानंतर तज्ञांकडून सूचना : घरात कोरोना फैलावण्याची शक्यता
भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होत असून रिकव्हरी रेटही वेगाने सुधारत आहे. परंतु याचदरम्यान एका अध्ययनाने वृद्धांना असलेल्या कोरोनाच्या धोक्याबद्दल सतर्क केले आहे. हा धोका त्यांना आसपास राहणारे आणि घराबाहेर पडून काम करणाऱया तरुणाईकडून आहे. लॅन्सेटमध्ये प्रकाशित अध्ययनानुसार भारतात बहुतांश घरांमध्ये एकत्र कुटुंब असते आणि छोटय़ा जागेत सोशल डिस्टन्सिंग राखणे अवघड ठरते. अशा स्थितीत वृद्धांमध्ये संक्रमणाच्या प्रसाराचे हे एक मोठे कारण ठरू शकते.
अभ्यासण्यात आलेला वृद्ध वयोगट पूर्वीपासूनच कमजोर आहे, तर कमी वयाच्या लोकांसोबत राहण्याचा अर्थ देखभाल प्राप्त करणेही असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सर्वसाधारपणे परिवारातील एक व्यक्ती संक्रमित झाल्यास जवळपास सर्वच कुटुंबीय संक्रमित होतात असे भारतात दिसून आले आहे. लोकांना पॉझिटिव्ह अहवाल आल्यावर एकाच घरात राहणाऱया वृद्ध लोकांना शारीरिक अंतर राखणे आणि वृद्धांची देखभाल करण्याचा सल्ला देत असल्याची माहिती डॉ. मनोज कुमार गोयल यांनी दिली आहे.
वृद्धांमध्ये मृत्यूदर अधिक
हे अध्ययन 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 2,79,961 व्यक्तींवर करण्यात आले आहे. 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये मृत्यूदर 20 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे डॉ. गोयल यांनी सांगितले आहे. गर्दीयुक्त ठिकाणी आणि झोपडपट्टीत राहणाऱया लोकांदरम्यान जोखीम अधिक आहे, तेथे सोशल डिस्टन्सिंग शक्य नाही. परंतु जागरुकतेचा अभाव समस्येत भर करत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
खबरदारी घेणे आवश्यक
मास्क परिधान करणे आणि किंचित संशयाच्या प्रकरणीही डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात चांगले ठरू शकते. लोकांनी आत्मसंतुष्ट होऊ नये आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी सूचना डॉ. नवनीत सूद यांनी केली आहे.