कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कार्यक्षेत्रात 95 कायमस्वरुपी स्वच्छता कामगार : तरीही कचराकुंडय़ा पूर्णक्षमतेने भरलेल्या
प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट हद्दीतील घरोघरी निर्माण होणाऱया कचऱयाची उचल करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहेत. पण रस्त्याशेजारी जमा होणाऱया कचऱयाची उचल करण्याची जबाबदारी कॅन्टोन्मेंट बोर्डची आहे. मात्र रस्त्याशेजारी साचलेल्या कचऱयाची उचल वेळेवर होत नाही. घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करूनही रस्त्याशेजारी कचरा कसा साचतो, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कार्यक्षेत्रात लष्करी प्रशिक्षण केंद्रासह बाजारपेठेचा परिसर येतो. कचऱयाची उचल करण्यासाठी 95 कायमस्वरुपी स्वच्छता कामगार नियुक्त केले आहेत. सध्या यापैकी 25 जागा रिक्त आहेत. कोरोना विषाणूंच्या प्रसारामुळे स्वच्छता कामागारांची नियुक्ती करण्यात आली नाही. पण कंत्राट पद्धतीने काही कामगारांची नियुक्ती करून स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे. यापैकी 35 कामगारांची नियुक्ती लष्करी प्रशिक्षण केंद्र परिसरातील रस्त्यांची स्वच्छता व कचऱयाची उचल करण्यासाठी करण्यात आली आहे. उर्वरित कर्मचारी कॅन्टोन्मेंट हद्दीतील कचऱयाची उचल, डेनेज वाहिन्यांची स्वच्छता आणि झाडलोट आदी कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
कॅन्टोन्मेंट बोर्डनेदेखील घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्याची मोहीम राबविली आहे. प्रारंभी दोन वॉर्डमध्ये ही मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, आता 7 वॉर्डमधील कचऱयाची उचल घरोघरी जाऊन करण्यात येते. तरीदेखील कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्त्यांशेजारी असलेल्या कचराकुंडय़ा पूर्ण क्षमतेने भरून वाहत असतात. पण या कचऱयाची उचल वेळेवर केली जात नाही. घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करूनही रस्त्याशेजारी कचरा कसा टाकला जातो, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. घरोघरी जाऊन कचऱयाची उचल वेळेवर केली जात नसल्यानेच नागरिक रस्त्याशेजारी कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही मोहीम प्रभाविपणे राबविण्याची गरज आहे.
व्यासायिकांना दंड, कॅन्टोन्मेंट बोर्डचे कचरा उचल करण्याकडे दुर्लक्ष
महानगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीवरील कचराकुंडय़ा नेहमीच भरून वाहत असतात. येथील कचऱयाची उचल वेळेवर केली जात नाही. विशेषत: डॉ. राजेंद्र प्रसाद चौक, युनियन जिमखाना परिसर, रामघाट रोड परिसर, इस्लामिया शाळेच्या मागील रस्त्याशेजारी, आरटीओ सर्कल अशा विविध ठिकाणी कचरा साचलेला असतो. महानगरपालिका हद्दीतील नागरिक हा कचरा टाकत असल्याचा आरोप कॅन्टोन्मेंट बोर्डकडून नेहमी होत असतो. कचरा टाकणाऱयांविरोधात काही पुरावे जमा करून कॅन्टोन्मेंट बोर्डने महापालिका हद्दीतील व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. तीन-पाच हजार रुपयांपर्यंत दंडही वसूल केला आहे. पण शहराच्या प्रवेशद्वारावर साचणाऱया कचऱयाची उचल करण्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्डचे नेहमी दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी विशेष उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.