प्रतिनिधी/ महाड
पनवेल तालुक्यातील पेधर येथे घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाल. महाडमध्ये दोन आठवडय़ापुर्वी इमारत कोसळून 17 जण मरण पावल्याची घटना ताजी असताना अवघ्या काही दिवसांतच दुसरी घटना घडली आहे.
पनवेल तालुक्यातील पेधर येथील उदय घना पाटील यांच्या मालकीच्या घरांमध्ये मुन्नार हरिजन आणि त्यांचे कुटुंब भाडय़ाने राहत होते. या घराची भिंत कोसळल्याने संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. या दुर्घटनेमध्ये घरात झोपलेल्या हिना या अकरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर हसिंका, अनपण, संतोष हे जखमी झाले. जखमींवर पनवेल येथील श्री साई रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका आणि प्रशासन त्वरीत घटनास्थळी रवाना झाले….