2019 मध्ये 11,99,509 मतदान : 2021 ला 10,16,024 मतदान : तब्बल 1,83,485 मतांची घट : 2 मे रोजी चित्र स्पष्ट होणार
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या वाढत असली तरी मतदानाचा टक्का घसरताना दिसत आहे. 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकूण 17 लाख, 71 हजार, 829 मतदानापैकी 11 लाख 99 हजार 509 मतदान झाले होते तर 2021 ला 18 लाख 13 हजार 567 मतदारांपैकी 10 लाख 16 हजार 024 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण मागील सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा 1 लाख 83 हजार 485 मतदारांनी मतदान केले नाही. त्यामुळे जो टक्का घसरला आहे, त्या टक्क्मयाचा लाभ कोणाला होणार, हे आता 2 मे रोजी स्पष्ट होणार आहे.
मतदारांची नोंद वाढत आहे. मात्र, मतदान करणाऱयांची संख्या घटत आहे. 2014 पासूनच ही घट सुरू आहे. वास्तविक पहाता जिल्हा प्रशासन, निवडणूक आयोग मतदान करण्याबाबत जनजागृती करत असते. तरीदेखील मतदानाची टक्केवारी घसरत आहे, ही बाब लोकशाहीला मारक ठरणारी आहे. सध्या कोरोनासारख्या गंभीर महामारीमुळे अनेकजण बाहेर पडले नसतील, ही बाब खरी असली तरी जी घट सुरू आहे, त्याबद्दल आता निवडणूक आयोग किंवा जिल्हा प्रशासन कोणती पावले उचलणार, हे भविष्यात पहावे लागणार आहे. मतदानाची टक्केवारी घसरली तरी याचा लाभ कोणत्या उमेदवाराला मिळणार, याबाबत चर्चेला ऊत आला आहे. यावेळी म. ए. समितीने लोकसभेची निवडणूक लढविली आहे. मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रीय पक्षात गेलेले मराठी भाषिकदेखील या निवडणुकीमध्ये नाराज होते. त्यामुळेही मतदान कमी झाल्याची चर्चा सुरू आहे. याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाईमुळेही काही जणांनी नाराज होऊन मतदानाचा हक्क बजावला नाही, असेही बोलले जात आहे.
कोरोनाची दहशत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक बाहेर पडले नाहीत. मात्र, त्यांच्याकडून घरीच मतदान करून घेण्यात आले आहे. मात्र, त्यालाही काही जणांनी विरोध केल्यामुळे निवडणूक अधिकारी व कर्मचाऱयांनीही बऱयाच ठिकाणी मतदारांकडे पाठ फिरविली असल्याचे बोलले जात आहे. काहीही असले तरी जी 10.57 घसरलेली टक्केवारी आहे, ही कोणाच्या पथ्यावर पडणार, हे पहावे लागणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे 2014 पेक्षा 2019 मध्ये 2 टक्क्मयांनी मतदान घसरले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या या पोटनिवडणुकीमध्ये तब्बल 10.57 टक्के मतदान कमी झाले आहे. यामुळे लोकसभेची मतदानाची टक्केवारी घटताना दिसत आहे.
मतदानाची अंतिम आकडेवारी 56.02 टक्के
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शनिवारी पार पडली. या निवडणुकीच्या मतदानासाठी सायंकाळी सातपर्यंत मतदारांना मतदान करण्यास वेळ देण्यात आला होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी मतदानाची आकडेवारी जमविण्यासाठी कसरत करत होते. शनिवारी 55.61 टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आता रविवारी मतदानाचा अंतिम आकडा 56.02 टक्के असा देण्यात आला आहे. त्यामुळे 2019 ला झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा 10.57 टक्के कमी मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभेसाठी एकूण दहाजण रिंगणात उतरले होते. यामध्ये मुख्य लढत तिहेरी झाली होती. म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके, भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांच्यामध्येच खरी लढत झाली. या मतदारसंघामध्ये एकूण 18 लाख 13 हजार 567 मतदार होते. त्यामधील 10 लाख 16 हजार 024 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट झाले. आता या मतदानाच्या आकडेवारीनंतर साऱयांचीच पडताळणी सुरू असून प्रत्येक जण आपलाच विजय होणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, 2 मे रोजीच चित्र स्पष्ट होणार आहे.
मराठीबहुल मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी
बेळगाव : लोकसभेसाठी सर्वात जास्त मराठीबहुल असलेल्या उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण मतदारसंघामध्ये जे मतदान झाले आहे. त्यामध्ये मराठी भाषिकांनी यावेळी मोठय़ा चुरशीने मतदान केले आहे. या तिन्ही मतदारसंघामध्ये एकूण 3,94,140 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. या निवडणुकीमध्ये म. ए. समितीने यावेळी शुभम शेळके यांना उमेदवारी दिली. त्यामुळे यामधील त्यांनी घेतलेली मते हीच या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार का? याबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे.बेळगाव उत्तर मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान झाले आहे. या मतदारसंघामध्ये मराठी भाषिक स्वतःहून मतदानासाठी बाहेर पडले होते. मात्र, राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते या निवडणुकीबद्दल नाराजीच व्यक्त करत होते. त्यामुळे दक्षिणमध्ये झालेल्या या मतदानामध्ये मराठी भाषिक उमेदवार असलेल्या शुभम शेळके यांना लाभ होणार, हे निश्चित आहे. ग्रामीण मतदारसंघात मात्र आकडेवारी वाढली असून त्यामध्ये म. ए. समितीसह भाजप आणि काँग्रेसनेही मतदान करून घेण्यासाठी कंबर कसली होती. त्याचबरोबर उत्तरमध्येही सर्वच पक्षांनी मतदान करून घेण्यासाठी धडपड केल्याचे दिसून आले आहे.
बेळगाव उत्तरमध्ये एकूण 2 लाख 42 हजार 618 मतदानापैकी 1 लाख 17 हजार 156 मतदान झाले आहे. बेळगाव दक्षिणमध्ये 2 लाख 43 हजार 027 पैकी 1 लाख 32 हजार 031 मतदान झाले आहे. तर बेळगाव ग्रामीणमध्ये 2 लाख 44 हजार 084 पैकी 1 लाख 44 हजार 953 मतदान झाले आहे. मराठीबहुल असलेल्या या तिन्ही मतदारसंघांमधील आकडेवारी पाहता मराठी भाषिकांनीही मोठय़ा चुरशीने मतदान केल्याचे दिसत आहे. एकूणच या तिन्ही मतदारसंघामध्ये अधिक मते घेतलेला व्यक्तीच विजयी होणार, हे निश्चित आहे.
मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी
मतदारसंघ | पुरुष मतदार | महिला मतदार | इतर | एकूण मतदार | झालेले मतदान (पुरुष) | झालेले मतदान (महिला) | इतर | एकूण |
अरभावी | 1,20,503 | 1,19,500 | 9 | 2,40,012 | 71,786 | 60622 | 0 | 1,32,408 |
गोकाक | 1,23,538 | 1,26,446 | 14 | 2,49,998 | 77,199 | 74,080 | 1 | 1,51,280 |
बेळगाव उत्तर | 1,20,502 | 1,22,105 | 11 | 2,42,618 | 62,504 | 54,651 | 1 | 1,17,156 |
बेळगाव दक्षिण | 1,22,705 | 1,20,316 | 6 | 2,43,027 | 70,238 | 61,793 | 0 | 1,32,031 |
बेळगाव ग्रामीण | 1,24,158 | 1,19,922 | 4 | 2,44,084 | 77,375 | 67,578 | 0 | 1,44,953 |
बैलहोंगल | 95,472 | 94383 | 3 | 1,89,858 | 55,697 | 47,235 | 0 | 1,02,932 |
सौंदत्ती | 99,145 | 98,239 | 0 | 1,97,384 | 62,363 | 53,145 | 0 | 1,15,508 |
रामदुर्ग | 1,05,010 | 1,01,565 | 11 | 2,06,586 | 64,467 | 55,288 | 1 | 1,19,756 |
एकूण | 9,11,033 | 9,02,476 | 58 | 18,13,567 | 5,41,629 | 4,74,392 | 3 | 10,16,024 |
लोकसभेची घसरलेली टक्केवारी
वर्ष | एकूण मतदार | झालेले मतदान | टक्केवारी |
2014 | 15,75,125 | 10,78,982 | 68.25 |
2019 | 17,71,829 | 11,99,509 | 66.59 |
2021 | 18,13,567 | 10,16,024 | 56.02 |