प्रतिनिधी / घुणकी
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच प्रारंभ किणी ( ता. हातकणंगले ) येथे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पदरकर यांच्या हस्ते करण्यात आला .
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ३२ व्या राष्ट्रीय सुरक्षा अभियानात पुणे बंगळूर महामार्गावर किणी टोल नाक्यावर झालेल्या कार्यक्रमात दिशादर्शक फलकावरील सुचनाचे व वाहतूक नियमाचे पालन केल्यास अपघात टाळण्यासाठी मदत होईल तर अपघात झालाच तर जखमींवर कोणते प्राथमिक करावे प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती दिली अपघात टाळण्यासाठी दिशादर्शक चिन्हाचा वापर करावा असे आवाहन सुरक्षा सल्लागार डॉ. अर्चना मानकर पाटील यांनी केले. यावेळी महामार्गावर वाहनधारकांना माहिती पुस्तकांचे वाटप व वाहतूक नियमाचे माहिती व अपघातानंतर जखमींना प्रथम उपचारासाठी प्रात्यक्षिक पार पडले.
याप्रसंगी रस्ते विकास महामंडळाचे प्रकाश करडे समाधान पाटील ,संजोग डोंगर,रनोज मल्लिक, प्रविण भालेराव,प्रताप भोईटे, याच्यासह राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे व राज्य रस्ते विकास महामंडळाचे जयहिद टोल नाक्यावरील कर्मचारी वाहनधारक उपस्थित होते.
पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी येथील टोलनाक्यावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाच प्रारंभ करताना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पदरकर प्रकाश करडे समाधान पाटील प्रविण भालेराव आदी उपस्थित होते.