प्रतिनिधी / बेळगाव
श्री घुमटमाळ मारुती मंदिर पब्लीक ट्रस्ट हिंदवाडीच्या अध्यक्षपदी अनंत लाड यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष संभाजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने ही निवड करण्यात आली आहे.
तर कंत्राटदार चंद्रकांत बांडगी यांची उपाध्यक्षपदी तर उद्योजक कुलदीप भेकणे यांची चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी गोपाळ बिर्जे, रघुनाथ बांडगी, रामभाऊ कुट्रे, नेताजी जाधव यांची अभिनंदनपर भाषणे झाली. सर्वांच्या सहकाऱयाने एक वर्षाच्या कारकिर्दीत विविध उपक्रम राबविण्याचा विश्वास अनंत लाड यांनी व्यक्त केला.
अनंत लाड हे निवृत्त शिक्षक व आनंद ऍडव्हटायझींग या जाहीरात वितरण संस्थेचे प्रमुख आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मारुती मंदिराचे विश्वस्त म्हणून ते काम पाहत आहेत. ते अनेक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. या बैठकीत बाबुराव पाटील, चंद्रकांत पवार, मोहन मेलगे, प्रकाश माहेश्वरी, ऍड. के. ए. साळवी आदी उपस्थित होते.