कृषी अधिकाऱयांकडून कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक
वार्ताहर / कणकवली:
कणकवली तालुक्यात घोणसरी येथे निळ्य़ा भुंग्यांच्या प्रादुर्भावामुळे भातशेती धोक्यात आली आहे. गेले चार दिवस पावसाने उघडिप दिल्याने हा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यासाठी तातडीने कीटकनाशक फवारणी करण्याची सूचना कृषी अधिकारी सुभाष पवार यांनी शेतकऱयांना देत त्याबाबत प्रात्यक्षिक दाखविले.
गेले चार दिवस पावसाने उघडिप दिल्याने घोणसरी येथील शेतकरी वसंत मराठे, संदेश जाधव, नितीन पांचाळ, मकरंद पारकर आदींच्या भातशेतीवर निळ्य़ा भुग्यांचा प्रादुर्भाव दिसू लागला. कृषी अधिकाऱयांना याबाबत माहिती देण्यात आली. कृषी अधिकारी पवार, कृषी सहाय्यक श्रीमती कानडे, सतीश जाधव, प्रशांत धुरी यांनी बाधीत भातशेतीच्या क्षेत्राला भेट देत शेतकऱयांना मार्गदर्शन केले.
कीडरोगाचा प्रादुर्भाव असल्यास शेतकऱयांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा व सल्ल्यानुसार कीटकनाशकाची फवारणी करावी, असे आवाहन पवार यांनी केले आहे.