कोल्हापूर/प्रतिनिधी
आजवर तुम्ही मुलींवर, महिलांवर बलात्कार झाल्याच्या घटना ऐकत आलाय. पण कोल्हापूर जिल्ह्यात जी घटना घडली, ती ऐकून तुम्हाला देखील संताप येईल. आणि तुम्ही म्हणाल! आता क्रूरकर्म्याची हद्द झाली. या संपूर्ण प्रकारचा पर्दाफाश वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
या घटनेला राज्यातील सगळ्यात किळसवाणा प्रकार म्हणावा लागेल. हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात गोठणे बीटात घडला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांना पकडलेले आहे. त्यांच्याकडून अनेक साहित्य जप्त केले आहे. कोकणातून या तीन आरोपींना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हे तीन तरुण शिकारीसाठी आले होते. त्या दरम्यान यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून मोबाईल देखील ताब्यात घेतले आहेत. पण जेंव्हा मोबाईल ताब्यात घेतला तेंव्हा मात्र अधिकाऱ्यांची झोप उडाली. चक्क या तिघांनी घोरपडी बलात्कार करत असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे वन अधिकाऱ्यांच्या तपासात समोर आले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोकणातून आरोपींना पकडलं असून शिकारीसाठी आल्यानंतर धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आले आहे. मात्र आरोपींवर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची यावर वन अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.