सर्वोच्च न्यायालयाकडून झटका : बँक घोटाळय़ाचे प्रकरण
वृत्तसंस्था/ दिल्ली
आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर यांना सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक झटका दिला आहे. बँकेतून बडतर्फ करण्याच्या निर्णयाच्या विरोधात दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळण्याच्या निर्णयाला चंदा कोचर यांनी आव्हान दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करू शकत नाही. हे प्रकरण खासगी बँक आणि कर्मचाऱयांमधील असल्याचे उद्गार संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे. चंदा कोचर यांनी उच्च न्यायालयाच्या 5 मार्च रोजीच्या आदेशाला आव्हान दिले होते.