बधितांपैकी 10 सुपेरस्प्रेडर नागरिक
वार्ताहर / चंदूर
हातकणंगले तालुक्यातील मौजे चंदूर येथील मेडिकल,किराणा दुकानदार,पान शॉप,भाजी विक्रेते अशा 310 सुपेरस्प्रेडर नागरिकांची कोविड आरटीपीसीआर तपासणी व दोघांची अँटीजन तपासणी करण्यात आली.त्याचा अहवाल मंगळवारी व बुधवारी या दोन दिवसात प्राप्त झाला.त्यामध्ये एक कापड दुकानदार महिला,एक किराणा दुकानदार,एक हॉटेल चालक,एक पतसंस्था कर्मचारी,एक डेयरी कर्मचारी,माळभागावरील एक भाजी विक्रेता,शाहूनगर परिसरातील तीन मासे विक्रेते आदींचा समावेश आहे.
यासोबतच अन्य नियमित तपासणीत बुधवारी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.यामुळे आज एक दिवसात 13 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. या आकडेवारी सोबत आतापर्यंत पॉझिटिव्ह नागरिकांची संख्या 115 वर पोहचली असून त्यापैकी 74 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. तर आतापर्यंत ऐकून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.याचबरोबर काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती डिस्चार्ज घेऊन घरी आला होता पण लगेच त्यांना म्युकर मायकोसिस सदृश रोगाची लक्षणे आढळली आहेत .म्हणून त्यांना परत कोल्हापुरातील सी.पी.आर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.