वार्ताहर / चंदूर
हातकणंगले तालुक्यातील चंदूर गावचे जेष्ठ नेते माजी ग्रामपंचायत सदस्य, सामाजीक कार्यकर्ते व उद्योजक पोपट उर्फ रविंद्र शिवगोंडा पाटील यांचे (वय -58 वर्ष )अल्पशा आजाराने निधन झाले. पंचायत समितीचे माजी सभापती सौ. शुभांगी पाटील यांचे पती होते.
चंदूर गावच्या सामाजिक, राजकीय विकासात रवींद्र पाटील यांचे योगदान मोलाचे आहे. ते आमदार प्रकाश आवाडे यांचे निकटवर्तीय होते. गेल्या वीस वर्षांपासून आवाडे गटाचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. गावामध्ये विवेकानंद पतसंस्था व जय किसान सेवा सोसायटीमध्येही ते विद्यमान संचालक होते. त्यांच्या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.