क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
कॅम्प येथील युनियन जिमखान्याची 84 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी कोणताही अर्ज दाखल न झाल्याने चंद्रकांत बांडगी व संजय पोतदार यांची बिनविरोध अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी फेरनिवड करण्यात आली.
या फेरनिवडीनंतर युनियन जिमखान्याचे सचिव प्रसन्ना सुंठणकर यांनी फेरनिवड झालेल्या चंद्रकांत बांडगी व संजय पोतदार यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केला. यावेळी सुहास कुलकर्णी, सुधाकर पाटणकर, विठ्ठल गवस, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. यावर्षी युनियन जिमखान्याचे काही सभासद राजू हंजी, संतोष हिंडलगेकर, अरुण मेणसे, के. के. जाधव, शिवानंद गोटूर, बी. एल. कामत, एम. कुलकर्णी यांना सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली.