ऑनलाईन टीम / चंद्रपूर :
आत्ता पर्यंत एकही कोरोना रुग्ण नसलेले चंद्रपूर ग्रीन झोन की ऑरेंज झोन मध्ये असणार ही चर्चा चालू असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चंद्रपूर मध्ये पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. एका 50 वर्षीय पुरुषाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती कृष्णनगर परिसरात राहणार असून त्याला दमा व खोकल्याचा त्रास होता. तसेच त्याला निमोनियाचा त्रास देखील झाला त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची कोरोनाची चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
सध्या या रुग्णास आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडून देण्यात आली.