ऑनलाईन टीम / चंद्रपूर :
चंद्रपूर जिह्यातील आयुध निर्माणी परिसरात विजेच्या तारा टाकून दोन बिबटे आणि दोन अस्वलांची शिकार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आयुध निर्माणी परिसरात वनविभागाला दोन बिबटे आणि दोन अस्वल मृतावस्थेत आढळले. वनाधिकाऱयांनी या परिसराची कसून चौकशी केली असता आयुध निर्माणी परिसरातील 11 केवीच्या उच्चदाब वीज वाहिनीवर तारा टाकून या चारही वन्यजीवांची शिकार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
आयुध निर्माणी परिसरात मोठय़ा प्रमाणात वन्यजीवांची वस्ती आहे. येथे वन्यजीवांचा मुक्तपणे वावर असतो. त्यामुळे शिकाऱयांनी ही शिकार केली असावी. चंद्रपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.