सावंतवाडी/प्रतिनिधी-
सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयातील किडनी डायलिसिस आर. ओ.प्लांटमध्ये शुक्रवारी सायंकाळी साप आढऴला. या डायलिसिस, आर. ओ प्लांटमध्ये औषधे, पाण्याचे टाकी आहे. तर बाहेरून खिडक्या उघड्या आहेत. या खिडक्यांमधून हा साप या खोलीत आला. कर्मचाऱ्यांच्या दृष्टिक्षेपात हा साप आला. त्यांची घाबरगुंडी उडाली त्यानंतर सर्पमित्र राजन निंबरे यांना बोलावून घेण्यात आले. त्यांनी सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. अशाप्रकारे साप येत असतील तर रुग्णांच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने खिडक्याव्यवस्थित बसूवुन घ्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद जामदार यांनी केली आहे या प्रकल्पाच्या बाजूलाच डायलेसिसचे रुग्ण उपचार घेत होते.