वाऱयामुळे फांद्या कोसळून वीजपुरवठा ठप्प : ग्रामीण भागात शनिवारी रात्रीपासून लाईट गुल : अपुऱया मनुष्यबळासह दुरुस्तीकामाला वेग
प्रतिनिधी / बेळगाव
अरबी समुदात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे तौक्ते चक्रीवादळ शनिवारी रात्रीपासून किनारपट्टीसह घाटमाथ्यावर धडकले. याचा फटका बेळगावमध्येही बसला. शनिवारी रात्री सुटलेल्या सोसाटय़ाच्या वाऱयामुळे हेस्कॉमला जोरदार दणका बसला. बऱयाच ठिकाणी झाडांच्या फांद्या पडून तर काही ठिकाणी वीजवाहिन्या तुटून हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले. यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासून बेळगाव शहर व परिसरात वीजपुरवठा ठप्प झाला होता.
शनिवारी रात्री सोसाटय़ाच्या वाऱयासह पाऊस दाखल झाला. यामुळे इन्सुलेटरमध्ये पाणी उतरणे, स्पार्क होणे अशा घटना घडून वीजपुरवठा बंद झाला. रेल्वेस्टेशन येथील आर. एम. -2 मध्ये रविवारी सकाळी 6 च्या सुमारास बिघाड झाला. याचसोबत हिंदवाडी, महावीरनगर, चन्नम्मानगर, टीचर्स कॉलनी, कपिलेश्वर कॉलनी या परिसरामध्ये झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. यामध्ये विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
बेळगाव तालुक्मयातील बऱयाच गावांमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून लाईट नसल्याचे दिसून आले. रात्रीपासून लाईट नसल्याने अनेकांचे मोबाईल बंद पडले होते. ग्रामीण भागातही बऱयाच ठिकाणी फांद्या पडून नुकसान झाले आहे. त्या त्या गावांमधील लाईनमन दुरुस्तीचे काम करीत आहेत. खनगाव येथे वीजखांब कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. शहापूर स्मशानभूमीसमोरील एक झाड विद्युत वाहिन्या तसेच महानगरपालिकेच्या कचरा जमा करणाऱया ट्रकवर कोसळले. यामध्ये वाहिन्यांसोबतच ट्रकचेही नुकसान झाले. यामुळे शनिवारची रात्र व रविवारचा दिवस ग्रामीण भागातील नागरिकांनी वीजेविना काढला.
कोविड सेंटरला पहिले प्राधान्य
वादळामुळे शहरातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. परंतु हॉस्पिटल तसेच कोविड सेंटरना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले. शहराच्या दक्षिण भागात असणाऱया एकूण 13 सेंटरना पर्यायी मार्गाने वीजपुरवठा करण्यात आला. रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी हेस्कॉमकडून घेण्यात येत होती.
नागरिकांच्या तक्रारींचे टप्प्याटप्प्याने निवारण
शनिवारी रात्रीपासून चक्रीवादळाच्या सुटलेल्या सोसाटय़ाच्या वाऱयामुळे वीजखांब तसेच वाहिन्या तुटून पडल्या. शहराच्या काही भागात झाडांच्या फांद्या पडून वीजपुरवठा बंद झाला होता. कर्मचारी आजारी असल्याने उर्वरित कर्मचाऱयांना घेऊन दुरुस्तीचे काम करावे लागत आहे. प्रारंभी कोविड सेंटरला सुरळीत वीजपुरवठा देण्यात येत असून, नागरिकांच्या तक्रारी टप्प्याटप्प्याने निवारण केल्या जातील, असे हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करूर यांनी सांगितले.