बेळगाव / प्रतिनिधी
केरळसह कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. हा धोका ओळखून नैर्त्रुत्य रेल्वेने बेंगळूर – गांधीधाम एक्स्प्रेसची एक फेरी रद्द केली आहे. बेंगळूर ते गुजरात या दरम्यानची ही रेल्वे बेळगावमधून धावते. यामुळे ज्यांनी बुकिंग केले आहे त्यांना याचा फटका बसला आहे.
बेंगळूर – गांधीधाम (06506) ही रेल्वे 15 रोजीची फेरी रद्द करण्यात आली. तर गांधीधाम- बेंगळूर (06505) ही रेल्वे दि. 18 रोजी रद्द करण्यात आल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेने दिली आहे.