प्रतिनिधी/ दापोली
शहरातील रामराजे एज्युकेशन सोसायटीच्या रामराजे महाविद्यालयाला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. वादळात विद्यालयाचे सुमारे 50 लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष संदीप राजपुरे यांनी दिली.
महाविद्यालयाच्या इमारतीचा वरचा मजला चक्रीवादळात पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. यात इमारतीचे पूर्ण छप्पर उडून गेले असून खिडक्या, 203 बेंच, 19 पंखे, 16 टय़ुबलाईट, 7 फळे, 27 खुर्च्या, दोन कपाटे, 8 संगणक, साऊंड सिस्टिम व पाण्याच्या टाक्यांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा महाविद्यालयाच्या भिंतींनाही दणका बसला असून यामुळे काही भिंती पाडून पुन्हा बांधाव्या लागणार आहेत. तरी प्रशासकीय यंत्रणेने नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे.