प्रतिनिधी/ खेड
खेड शहरानजीक भरणेनाका येथील एका बेकरीत ढोकळय़ाच्या चटणीत मृतावस्थेतील बेडूक आढळून आल्याच्या वृत्ताची गंभीर दखल अन्न औषध प्रशासनाने घेतली आणि त्या परिसरात 9 दुकानांच्या तपासण्या करण्यात आल्य़ा त्यापैकी 6 बेकरी व स्वीटमार्टवाल्यांनी नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून येताच त्यांनी दुकाने बंद ठेवावीत, असे आदेश जारी करण्यात आल़े
खेड तालुक्यातील तळे येथील एका ग्राहकाने खरेदी केलेल्या ढोकळय़ाच्या चटणीतून मृत बेडूक आढळल़ा संबंधिताने या प्रकरणी तक्रार देण्यास नकार दिल्याने प्रकरण तेवढेच राहिले. ‘तरूण भारत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्याची दखल अन्न व आष्wाध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त इम्रान हाश्मी यांनी घेतल़ी अन्न पर्यवेक्षक प्रशांत गुंजाळ यांना तपासणी मोहिमेवर पाठवले. शुक्रवारी सकाळी अधिकाऱयांचे पथक भरणे येथे दाखल झाले. या पथकाने संबंधित बेकरीत जाऊन संपूर्ण खाद्यपदार्थांसह कागदपत्रांची तपासणी केली. तब्बल एक ते दीड तास ही तपासणी सुरू होती. अचानक आलेले पथक पाहून बेकरी व्यावसायिकांची त्रेधातिरपीट उडाली. या पथकाने कागदपत्रांची शहानिशा केल़ी तपासणी पथकाने भरणेनाका परिसरात एकूण 9 दुकानांना भेटी दिल्य़ा त्यात स्वीटमार्ट विक्री व उत्पादन दुकाने तसेच बेकरी यांचा समावेश होत़ा यापैकी बहुसंख्य म्हणजे 6 ठिकाणी कायद्यातल्या तरतुदी ढाब्यावर बसवल्याचे दिसून आल़े या सर्व 6 दुकानांनी आपल्या दुकानदारांनी आपला व्यवसाय तत्काळ बंद करावा, अशी शिफारस त्यांनी केल़ी समुचित अधिकाऱयांनी हे आदेश जारी केल़े
दरम्यान, या गंभीर प्रकाराबाबत भरणे ग्रामपंचायतीच्या सरपंच ललिता जाधव यांच्याकडे संपर्क साधला असता बेकरी व्यावसायिकांकडून स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली केली जात असेल तर ती कदापीही खपवून घेतली जाणार नाही. संबंधित बेकरीसह परिसरातील अन्य बेकरीच्या दुकानांच्या तपासणीची मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिसरातील चौपदरीकरण कामामुळे बहुतांश दुकाने हटवण्यात आली आहेत. मात्र या दुकान व्यावसायिकांनी उघडय़ावरच दुकाने थाटली असून त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खेड शहरातही तपासणीची धडक मोहीम सुरू
भरणे येथील एका बेकरीतून खरेदी करण्यात आलेल्या ढोकळय़ाच्या चटणीत आढळलेल्या मृत बेडकाच्या गंभीर प्रकारानंतर खेड येथील नगर परिषद प्रशासन सतर्क झाले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी तातडीने शहरातील स्वीटमार्ट दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्वच्छता व आरोग्य सभापती प्रशांत कदम यांच्यासह स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर व त्यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास स्वीटमार्ट दुकानांच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेतली. या धडक कारवाईने बेकरी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
अन्न अस्वच्छता तक्रारींचे स्वागतच
केवळ भरणे-खेड येथील नव्हे तर अन्य ठिकाणच्या सर्व सामान्य ग्राहकांनी अस्वच्छता दिसून येणाऱया अन्न उत्पादकांच्या विरूद्ध तक्रारी नोंदवाव्यात, या दुकानदारांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल़ तक्रार नोंदवणे हा ग्राहकाचा प्राथमिक अधिकार असून ग्राहकांनी तो बजावाव़ा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त इम्रान हाश्मी यांनी केल़े