टाटा स्टीलचे समभाग 6 टक्क्यांनी घसरले : सलगची तिसरी घसरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय भांडवली बाजारात मंगळवारच्या सत्रात सलग तिसरी घसरण राहिल्याचे दिसून आले यामध्ये दिवसभरातील दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स 106 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. जागतिक बाजारातील काही स्थिती सुधारणात्मक राहिली परंतु यातूनही बाजाराला तेजी राखता आली नाही.
मंगळवारच्या सत्रात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया एक दिवसाच्या अगोदर विक्रमी घसरणीतून उभारत आहे. मात्र शेअर बाजारात मोठय़ा प्रमाणात जोखीम न घेता बचाव करण्याचा प्रयत्न होत आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी देशातील बाजारात दबावाची स्थिती निर्माण केल्याचे दिसून आले.
बीएसईमध्ये चढउताराच्या प्रवासात दुपारपर्यंत मजबूत वातावरण होते. मात्र नफा वसुलीच्या दबावात बाजार जात विक्रीचा जोर वाढला यामुळे दिवसअखेर सेन्सेक्स 105.82 अंकांनी घसरुन निर्देशांक 54,364.85 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 61.80 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 16,240.05 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक म्हणजे 6.95 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. सन फार्मा, एनटीपीसी, टायटन, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा आणि आयटीसी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. दुसऱया बाजूला हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेन्ट्स, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, कोकट महिंद्रा, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड आदीचे समभाग 3.24 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. बाजारात सलग तिसऱया सत्रात घसरण राहिली आहे. तसेच युरोपीय शेअर बाजार वाढले आहेत. बाजारात बीएसई स्मॉलकॅप 2.11 टक्के आणि मिडकॅप 1.98 टक्के घसरले आहे. जागतिक बाजारात जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँगसेंग व दक्षिण कोरियाचा कोस्पी हे बाजार मात्र घसरणीत राहिल्याचे दिसून आले आहे.