जागतिक वातावरणाचा प्रभाव – सेन्सेक्स 21 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात अंतिम दिवशी शुक्रवारी जागतिक पातळीवरील नकारात्मक वातावरणामुळे भारतीय शेअर बाजारात चढउताराचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले. यामध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी स्थिरावत बंद झाले आहेत. दिवसअखेर सेन्सेक्स 21.12 अंकांनी वधारत बंद झाला आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 21.12 अंकांसह 0.04 टक्क्यांची तेजीची झुळूक नोंदवत निर्देशांक 52,344.45 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 8.05 अंकासोबत 0.05 टक्क्यांच्या काहीशी घसरण नोंदवत निर्देशांक 15,683.35 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांमध्ये ओएनजीसीचे समभाग सर्वाधिक 4 टक्क्यांनी घसरले आहेत. यासोबतच एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, नेस्ले इंडिया, भारतीय स्टेट ब्ँाक आणि एचसीएल टेकच्या समभागात घसरण राहिली आहे. तर दुसऱया बाजूला हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज ऑटो, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्हसह अन्य समभाग नफा कमाईत राहिल्याची नोंद केली.
भारतीय शेअर बाजारातील सप्ताहातील अंतिम दिवशीच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टीमध्ये चढउताराचे वातावरण राहिले. यामध्ये दिवसभरात दैंनदिन वापरातील साहित्यांची निर्मिती करणारी कंपनी एफएमसीजी आणि औषध यांना वगळता अन्य सर्व प्रमुख क्षेत्रांचा निर्देशांक प्रामुख्याने नुकसानीत राहिल्याचे पहावयास मिळाले. दुसऱया बाजूला सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि रियल्टीचा निर्देशांकात मात्र मोठी घसरण राहिली आहे.
जागतिक पातळीवर सुरु असणाऱया निवडक घडामोडींचा परिणाम काही अंशी सकारात्मक तर काही अंशी नकारात्मक राहिल्यानेच याचा दबाव भारतीय भांडवली बाजारामध्ये राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
सप्ताहातील तेजीनंतर मध्यम आणि लहान कंपन्यांच्या समभाग नफावसुली राहिली होती. तर जागतिक बाजारांपैकी आशियातील अन्य बाजारात हाँगकाँग आणि सोल हे तेजीत राहिले. तर शांघाय आणि टोकीओ हे नुकसानीत राहिल्याची नेंद केली आहे.