प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयात गणेश चतुर्थीच्या सणासाठी भाविकांमध्ये उत्साही वातारणआहे. आज विराजमान होणाऱया गणपतीसाठी घराघरात उत्साही वातावरण असून चतुर्थी साजरी करण्यास पेडणेकर सज्ज झाले आहेत.चतुर्थी सणावर पावसाचे सावटअसल्याने काही प्रमाणात भाविक निरुत्साही दिसत होते. वाढती महागाई तसेच यंदाही कोरोनाच्या छायेखाली चतुर्थीचा सण साजरा होत आहे.माञ भाविक तसेच नागरिकांनी महागाईची पर्वा न करता माटोळी साहित्य , भाजी , गणपती आरस साहित्य खरेदी करताना त्यांच्या चेहऱयावर आनंद दिसत होता.
गोमंतकीयांचा सर्वात मोठय़ा आणि उत्सवी सण म्हणजे गणेश चतुर्थी या सणाची आतुरतेने वर्षभर सर्व गणेश भक्त वाट पहात असतात.त्या गणगायचे पूजन आज होणार आहे.
कोरोना आणि महागाईच्या संकटातही भाविकांमध्ये उत्साह
गेल्या वषी चतुर्थी उत्सवात कोरोना संकट मोठय़ा प्रमाणात होते.त्यात अनेकांचे बळी गेले होते.यंदा कोरोनाचा कहर कमी असल्याने भाविकांमध्ये उत्साही वातावरण आहे. महागाईने जनता ञस्त आहे.तारीही आपल्या लाडक्मया बाप्पासाठी दुप्पट पैसे देऊन महाग वस्तू तसेच माटोळी साहित्य केले.
बाजारात सर्वच वस्तूंचे दर दामदुप्पट
पेडणे बाजारपेठत चतुर्थी सणासाठी भरलेल्या बाजारातील माटोळी , भाजी , केळी, नारळ, सुपारी काञी, कांगले , दोर , रानसाहित्य यांचे दर अव्वाचे सव्वा आकरण्यात आले. केळय़ाचे घड , अ?पल, मोसंबी , चिकू , चिबुट , भोपळा , मुळे तांबडी भाजी, सुरण आदी भाज्याचे दर न परवडणारे होते.
पेडणे आणि मांदेत राजकीय इच्छुक उमेदवारांचे बनर्र युध्द
विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवून पेडणे आणि मांदे मतदारसंघात विधानसभा निवडणूकीचे इछ्छ?क उमेदवारांनी वा त्यांच्या समर्थकांनी ब?नर्र लावून गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या .पेडणे मतदारसंघात उपमुख्यमंञी बाबू आजगावकर , मगो नेते प्रवीण आर्लेकर, मिशन लोकलचे राजन कोरगावकर , गोवा फा?रवर्डचे जितेंद्र गावकर, शिवसेनेचे सुभाष केरकर, आमआदमी पक्षाचे पुंडलिक धारगळकर यांनी पेडणे मतदारसंघात विविध भागात ब?नर्र लावून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.
मांदे मतदारसंघात आमदार दयानंद सोपटे , मगोचे जीत आरोलकर , माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, काँग्रेसचे सचिन परब , सतीश शेटगावकर , गोवा फा?रवार्डचे दिपक कळंगुटकर , आमआदमी पक्षाचे प्रसाद शहापूरकर आदिनी ब?नर्र लावून शुभेच्छा दिल्या .
राजकारण्याकडून साहित्याचे वाटप , बाबू आजगावकर आणि प्रवीणचीच चर्चा
पेडणे मतदारसंघात उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांनी तेलाच्या बाटल्या वाटल्या .मगोनेते प्रवीण आर्लेकर यांनी चतुर्थीसाठी आर्थिक सहाय्य तसेच कपडे भेट दिले. शिवसेनेचे सुभाष केरकर यांनी पूजेचे साहित्य व आरती संग्रह याचे वाटप केले. ड़ मांदे मतदारसंघात आमदार सोपटे यांनी कडधान्य वाटप केले.तर जीत आरोलकर यांनी चतुर्थीसाठी खास निरंजनाचे वाटप केले. तुये पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य निलेश कांदोळकर यांनी आपल्या पंचायत प्रभागात कडधान्य तसेच आरती संग्रह वाटप केले.