प्रतिनिधी /बेळगाव
पहिला स्टेज, राणी चन्नम्मा चौक येथे बांधण्यात आलेल्या नव्या पोस्ट कार्यालयाचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. या नव्या पोस्ट कार्यालयामुळे नागरीकांना त्यांच्या विभागातच सर्व पोस्ट खात्याच्या सेवा उपलब्ध होणार असल्याने रहिवाशांमधून समाधान क्यक्त होत आहे.
यापूर्वी कोणत्याही पोस्ट सेवांकरीता राणी चन्नम्मा नगर येथील नागरीकांना व्हॅक्सिन डेपो येथील कार्यालयात यावे लागत होते. यासाठी पोस्ट विभागाने चन्नम्मा नगर येथे स्वतंत्र्य पोस्ट कार्यालय सुरू केले आहे. याठिकाणी सर्व प्रकारच्या सेवा नागरीकांना दिल्या जाणार आहेत.
उद्घाटन समारंभाला खासदार मंगला अंगडी, पोस्ट मास्टर जनरल डॉ. एन. विनोदकुमार, पोस्ट अधिक्षक एच. बी. हसबी यांच्यासह पोस्ट कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी पोस्ट कार्यालयात खाते उघडण्यासाठी परिसरातील नागरीकांनी गर्दी केली होती.