प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत पोलीस दलाची भूमिका महत्त्वाची आहे. जसे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी उपचारात गुंतले आहेत. तसेच रस्त्यावरची लढाई पोलीस लढत आहेत. शुक्रवारी सायंकाळी पोलीस दलाच्यावतीने कोरोनाविषयक जागृती करण्यात आली.
महिलांची छेडछाड करणाऱया सडकसख्याहरींना अद्दल घडविण्यासाठी व महिलांना त्वरित पोलिसांची मदत मिळावी यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चन्नम्मा पथकातील महिला पोलिसांनी ‘घरात रहा, सुरक्षित रहा’चे फलक दाखवत जागृती केली. यावेळी चित्ता मोटारसायकलीवरूनही फलक दाखवत जनजागृती करण्यात आली.
नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे. 3 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. संपूर्ण जगाला संत्रस्त केलेल्या कोरोनाला थोपविण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी केले.