पदव्युत्तर-बीएडच्या परीक्षा ढकलल्या पुढे
प्रतिनिधी /बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या बीएड व पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दि. 14 सप्टेंबरपासून या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. परंतु तांत्रिक कारणामुळे या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा दि. 14 सप्टेंबरपासून घेतल्या जाणार होत्या. तर बीएड अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. 15 सप्टेंबरपासून होणार होत्या. परंतु यामध्ये तांत्रिक अडचणी आल्याने पदव्युत्तर परीक्षा 17 पासून तर बीएड परीक्षा दि. 20 सप्टेंबरपासून घेतल्या जाणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एमए, एमकॉम व एमसीएच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाने म्हटले आहे.