मृतांची संख्या 68 वर; अजूनही 136 बेपत्ता
ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडच्या चमोलीतील जोशींमठ येथे हिमकडा कोसळून घडलेल्या दुर्घटनेच्या 16 व्या दिवशीही आज तपोवन बोगदा आणि बॅरेजच्या जागेवरील राडारोडा काढण्याचे काम सुरू आहे. बोगद्यात वारंवार पाणी गळती होत असल्याने राडारोडा हटवण्यात अडचणी येत असून, आतापर्यंत बोगद्यात 171 मीटरपर्यंत खोदण्यात आल्याचे एनडीआरएफने म्हटले आहे.
रविवारी बॅरेजच्या ठिकाणाहून दोन आणि बोगद्यातून एक मृतदेह हाती घेण्यात आला. आतापर्यंतच्या सर्व मृतदेहांची ओळख पटली आहे. आतापर्यंत 68 मृतदेह आणि 28 मानवी अवयव सापडले आहेत, तर अजूनही 136 जण अद्याप बेपत्ता आहेत. तपोवन बोगदा आणि बॅरेजच्या ठिकाणी एनडीआरएफकडून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.