प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापुरात काही दिवसांपुर्वी पुण्यातील वृद्धेला श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने खासगी रूग्णालयात दाखल केले होते, उपचार सुरू असता शनिवारी तिचा मृत्यू झाला, मृत्युपुर्वी तिचा स्वॉब पुण्याला कोरोना तपासणीसाठी पाठवला, त्यामुळे तिचा कोरोनाने मृत्यू झाल्याची चर्चा होती, प्रत्यक्षात रविवारी आलेल्या तिच्या एनआयव्ही रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू अन्य कारणाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे, तिचा मृत्यू कोरोनाने झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्हा प्रशासनाने कोरोना तपासणीसाठी सीपीआरसह शहरातील पाच खासगी हॉस्पिटल्समध्ये सुविधा दिली आहे. सद्यस्थितीत एका कोरोना पॉझिटिव्ह रूग्णावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्राधान्याने अधिकतर संशयितांची तपासणी सीपीआरमध्ये होत आहे. इचलकरंजीत आयजीएम आणि गडहिंग्लजमध्ये उपजिल्हा रूग्णालयात संशयितांची तपासणी करून स्वॉब घेतले जात आहेत. कोल्हापुरात कोरोना तपासणी दरम्यान कित्येकांना थेट कोरोंटाईन केले. खासगी हॉस्पिटल्समध्ये काहींवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून त्यांच्या स्वॉब आणि आलेल्या रिपोर्टची माहिती दिली जात आहे.
खासगी हॉस्पिटलमध्ये पुण्यातील वृद्धेवर उपचार सुरू होते. तिचे स्वॉब पुणे येथे पाठवले होते. या वृद्धेचा शनिवारी मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये तिचा अहवाल राखीव, प्रलंबित ठेवल्याचे स्पष्ट केले होते. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी संबंधित वृद्धा पुण्याची आहे. तिला किडनीसह अन्य डिसीजही होते. त्यामुळे तिचा मृत्यू अन्यत्या वृद्धेच्या स्वॉबचा रिपोर्ट आला, यामध्ये अन्य कारणामुळे तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तिला किडनी विकार, अन्य डिसीज असल्याने त्यातून तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्या 68 वर्षीय वृद्धेचा मृत्यू कोरोनाने झाल्याची चर्चा होती. रविवारी एनआयव्ही रिपोर्टमध्ये अन्य कारणाने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने कोरोना बळीची चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.