1.15 कोटी डॉलर्सची मिळाली किंमत
विन्स्टन चर्चिल यांच्या मोरक्कोतील दृश्य दर्शविणारया चित्राला एका लिलावात विक्रमी 1.15 कोटी डॉलर्सपेक्षा अधिक किंमत मिळाली आहे. हे चित्र हॉलिवूड स्टार अँजेलिना जोलीकडून विकण्यात आले आहे. लंडनच्या क्रिस्टीमध्ये ‘टॉवर ऑफ द कोउटोबिया मॉस्क’ हे चित्र 82,85,000 पौंडमध्ये (1,15,90,715 डॉलर्स) विकले गेले आहे. विक्रीपूर्वी याची किंमत 15 लाख पौंड ते 25 लाख पौंड ठेवण्यात आली होती.
यापूर्वी चर्चिल यांचे सर्वात महागडे चित्र 18 लाख पौंडमध्ये विकले गेले होते. या चित्रात ऍटलस पर्वताच्या पार्श्वभूमीवर सूर्यास्तावेळची मोरक्कोतील 12 व्या शतकातील मशिद रेखाटण्यात आली होती. अमेरिकेचे माजी अध्यक्ष प्रँकलिन डी. रुझवेल्ट यांचे 1945 मध्ये निधन झाल्यावर त्यांच्या मुलाने हे चित्र विकले होते. त्यानंतर ते अनेकांनी खरेदी केले. 2011 मध्ये हे चित्र अँजेलिना आणि त्यांचा पूर्वाश्रमीचा पती ब्रॅड पिटने खरेदी केले होते.
हे दांपत्य 2019 मध्ये विभक्त झाले होते. तर चर्चिल यांच्या चित्राची विक्री ‘जोली फॅमिली कलेक्शन’कडून करण्यात आली असून खरेदीदारासंबंधी अद्याप कुठलीच माहिती मिळालेली नाही. भारताचे अखेरचे व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन आणि त्यांची पत्नी एडविना यांचा कोटय़वधींचा खजिना लिलावात विकण्यात येणार आहे. या खजिन्यात दागिने, सोन्याचे घडय़ाळ, हीऱयाने तयार ब्रॉच आणि 1950 च्या दशकातील खेळणी सामील आहेत.