महाराष्ट्रातून येणाऱया वाहनांची तपासणी
प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा झपाटय़ाने वाढल्याने बेळगाव जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा हद्दीवर तातडीने कोरोना चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाबरोबर ग्रामीण भागातील सीमाहद्दांrवर चेकपोस्ट उभारले आहेत. बाची, अतिवाड क्रॉस व चलवेनहट्टी क्रॉसजवळ चेकपोस्ट उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे. यासाठी पोलीस व आशा कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून येणाऱया वाहनांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस व आरोग्य विभागाने तातडीने हे चेकपोस्ट उभारले आहेत. पोलीस वाहनांची तर आशा कार्यकर्त्या आरोग्यासंबंधी चौकशी करून थर्मल स्क्रिनिंग करत आहेत. विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्याला लागून असलेल्या सीमाभागातील ग्रामीण भागात मास्क वापरण्याविषयी जनजागृती केली जात आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱया व महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया प्रत्येक वाहनावर अधिकाऱयांकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे.