वाहने लावण्यावर निर्बंध घालण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
चक्हाट गल्ली येथील मराठी शाळेसमोरील रस्त्यावर खासगी वाहनांचे पार्किंग केले जात आहे. यामुळे मराठी शाळेसह मराठा मंडळ शाळेमध्ये जाणाऱया विद्यार्थ्यांना या पार्किंगचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ये-जा करणाऱया वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांचे पार्किंग करू नये, अशी मागणी रहिवाशांमधून होत आहे.
शहरातील रस्ते जरी मोठे झाले असले तरी त्यावर वाहने पार्किंग केले जात असल्याने पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. चव्हाट गल्ली येथे अनेक कार्यालये असल्यामुळे येथे येणारे नागरिक मराठी शाळेसमोर वाहने लावत आहेत. काहीवेळा अवजड वाहनेही लावण्यात येत असल्यामुळे त्याचा फटका विद्यार्थी व पालकांना बसत आहे. त्यामुळे वाहने लावण्यावर निर्बंध आणण्याची मागणी होत आहे.