श्री चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
श्री स्पोर्ट्स खडक गल्ली आयोजित श्री चषक निमंत्रितांच्या आंतरजिल्हा टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात चव्हाण ब्रदर्सने दक्ष संघाचा, ग्रामीण वारियर्स संघाने मराठा स्पोर्ट्स संघाचा, एसआरएस संघाने राजमुद्रा संघाचा, आरोही स्पोर्ट्सने डॅडि किंग संघाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. विजय नाकाडी, शंकर तेरवाडकर, अनिकेत लोहार, आफर पठाण यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात चव्हाण ब्रदर्सने प्रथम फलंदाजी करताना 7 षटकात 3 गडी बाद 82 धावा केल्या. त्याला उत्तर देताना दक्ष संघाने 7 षटकात 7 गडी बाद 56 धावाच केल्या. दुसऱया सामन्यात मारिहाळ संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 षटकात 2 गडी बाद 81 धावा केल्या. त्याला उत्तर देताना मराठा स्पोर्ट्सने 7 षटकात 5 गडी बाद 57 धावाच केल्या.
तिसऱया सामन्यात राजमुद्रा स्पोर्ट्स मंडोळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 षटकात 6 गडी बाद 41 धावा केल्या. त्याला उत्तर देताना गुड्डे स्पोर्ट्स एसआरएस संघाने 5 षटकात 3 गडी बाद 43 धावा करून सामना 7 गडय़ानी जिंकला.
चौथ्या सामन्यात आरोही स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करतान 7 षटकात 6 गडी बाद 62 धावा केल्या. त्याला उत्तर देताना डॅडी किंग संघाने 7 षटकात 4 गडी बाद 59 धावाच केल्या.
पाचव्या सामन्यात एसजी स्पोर्ट्स संघाने 7 षटकात 4 गडी बाद 110 धावा केल्या. त्याला उत्तर देताना युपी संघाने 7 षटकात 5 गडी बाद 54 धावाच केल्याने एसजी स्पोर्ट्सला मोठा विजय मिळाला.