नरेगा योजनेतून साकारले ? ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक / युवकांसाठी ठरणार लाभदायक
कृष्णा आरगे / बेडकिहाळ
महात्मा गांधीजींनी मूलमंत्र दिला आहे की, ग्रामीण भागाचा विकास झाला तर देशाचा होईल. या महात्मा गांधीजींच्या तत्वावर चालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासाबरोबर ग्रामीण भागातील सरकारी शाळांचा विकास साधण्यासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये विकासकामांना गती मिळाली आहे. याच दृष्टीकोनातून निपाणी तालुक्मयातील चाँदशिरदवाड ग्रामपंचायतीने नरेगा योजनेतून गावातील सरकारी शाळा आवारात बनविलेले क्रीडांगण निपाणी तालुक्मयातील अन्य ग्रामपंचायतीसाठी मॉडेल ठरले असून या ग्रा. पं. च्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
चाँदशिरदवाड गाव हे निपाणी आणि चिकोडी मतदारसंघाच्या सीमेवर वसले आहे. येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात सर्वसामान्यांना मूलभूत सेवा, सुविधा पुरवण्यासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. गावात सरकारी मराठी, कन्नड, उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा एकाच ठिकाणी आहेत. या ठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. जुन्या शाळा खोल्यांच्या दुरुस्तीबरोबर नव्या शाळा खोल्या शासकीय निधीतून उभारण्यात येत आहेत. येथील विद्यार्थ्यांसाठी मोठे क्रीडांगण आहे. पण ते सुविधा अभावी असून अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत आहे. याकडे ग्रामविकास अधिकारी रविकांत यांनी लक्ष देत सदर क्रीडांगणाचा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास केला जावा का?, असा प्रस्ताव ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांसमोर ठेवला होता. याला सर्वांनी अनुमती दिल्याने क्रीडांगणाचे भाग्य उजळले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांबरोबरच गावातील विद्यार्थी, युवकांसाठीही हिताचे निर्णय घेण्यासाठी ग्रा. पं. अध्यक्ष सुरेश खोत, उपाध्यक्षा जयश्री पाटील, सर्व सदस्यांसह संजय पाटील, रामगोंडा पाटील, अमर कांबळे, अशोक पाटील, सय्यद मुजावर, जावेद मुजावर, किरण कांबळे, अनिल पुजारी, बेडकिहाळचे निवृत्त क्रीडा शिक्षक अनिल मालगते व गावातील सर्व नेतेमंडळी, ग्रामस्थांच्या विशेष सहयोगाने नरेगा योजनेच्या माध्यमातून 10 लाख निधीची तरतूद करण्यात आली.
क्रीडांगणात रनिंग ट्रक, खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डी कोर्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी खानापूर येथील लालमातीचा वापर करून नियमानुसार व सुसज्ज क्रीडांगण तयार करण्यात आले आहे. याठिकाणी येत्या काळात सोलारवर विजेची व्यवस्था केली जाणार आहे. निपाणी तालुक्मयातील 27 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारचे क्रीडांगण बनविण्यात आलेले नाही. सदर क्रीडांगण सर्वांसाठी आदर्शवत ठरले आहे.
विकासासाठी सर्वांच्या सहकार्य मोलाचे
चाँदशिरदवाडच्या सर्वांगीण विकासाठी आम्ही सर्व एकत्रित येऊन काम करत आहोत. ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी म्हणून रविकांत हे लाभले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये अनेक विकासकामे हाती घेण्यात आली आहे. 10 लाखाच्या निधीतून अद्ययावत क्रीडांगण उभारण्यात आले आहे. याचा विद्यार्थी, युवकांसह सर्वांना लाभ होणार आहे. गावच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य मोलाचे ठरल्याने हे शक्मय झाले असल्याचे मत ग्रा. पं. अध्यक्ष सुरेश खोत यांनी सांगितले.