सांखळी गट कॉग्रेसतर्फे शिक्षकांचा सन्मान सोहळा
सांखळी/प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघातिल सर्वउत्कृष्ट सेवा बजावणाऱया शिक्षकांचा सांखळी गट कॉग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला शिक्षकदीना निमित्त स्व गुरुदास गावस विद्यालयात सादर कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कॉग्रेसचे एम के शेख, खास आमंत्रित राजेंद्र जोशी, नगराध्यक्ष राया पार्सेकर, माजी आमदार प्रताप गावस, धर्मेश सगलानी, सुनीता वेरेकर,प्रवीण ब्लेगन, मंगलदास नाईक, खेमलो सावंत, अनंत पिसुरलेकर, व इतर मान्यवर उपस्थित होते
चांगला माणूसच उत्तम प्रचारक होऊ शकतो : शेख
सांखळी शहर ही देवभूमी आहे येथील श्री विठ्ठल, श्री गुरुदत्त,आणि श्री राधाकृष्ण ही प्रमुख मंदिरे आहेत त्या मुळे शहरात शांतीमय वातावरण निर्मिती होताना दिसत आहे , शिक्षक सन्मान सोहळा ही चांगली कल्पना असल्याने राजकारण वितरीत इतर कामात ही कार्यकर्ते काम करताना दिसतात हा गुण घेण्यासारखा असून येथे चांगला माणूसच उत्तम प्रचारक बनून समाज्यातील शेवटच्या घटका पर्यंत पोचतो असे मत एम के शेख यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले
सदानंद हिंदे, भिसो गावस,गोविंद अवखळे, सुरेश गावस,पुरुषोत्तम कोलमकर, संतोष भगत, सुभाष गोवेकर या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमचे सूत्रसंचालन रेणुका देसाई यांनी केले तर धर्मेश सगलानी यांनी आभार मानले.