कुडतरीतील कोव्हीड रुग्णांचा आकडा पाहून पंचायतीने घेतलेला निर्णय
प्रतिनिधी / राय
कुडतरी गावात सापडलेल्या 21 कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर चांदर गावचा बाजार पुढील पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय चांदरच्या स्थानिक प्रशासनाने घेतलेला आहे.
यासंबंधी चांदर पंचायतीने एक नोटीस जारी करुन चांदर ग्रामस्थांना सावध केलेले आहे.
जवळचा गाव म्हणून ओळखण्यात येणाऱया कुडतरी गावात कोव्हीड-19 रुणांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणि चांदर गावातील या बाजारात येणारे बहुसंख्य विक्रेते हे कुडतरीचे असतात. या पार्श्वभूमीवर चांदर मार्केट आज 23 जून ते 27 जून 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे असे चांदर पंचायतीने ग्रामस्थांना उद्देशून लिहीलेल्या या नोटीसेत म्हटलेले आहे.
या बंदच्या दरम्यान, चांदर बाजारात फवारणी मारुन चांदर मार्केट निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन चांदरचे सरपंच एडवर्ड डिसिल्वा यांनी केले आहे.