देवगड :
चांदोशी-तांबळवाडी येथील दीपक तावू घाडी (44) या तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरासमोरील आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आढळून आला. या घटनेची माहिती तेथील पायाजी नामदेव जाधव यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. दीपकच्या मृत्यूमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. देवगड पोलीस स्थानकात घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार तुकाराम पडवळ करीत आहेत.