ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरविणाऱयावर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात राज्यात हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे आदेश नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिल्यानंतर राज्यभरात अशा प्रकारचे गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होत आहे. सातारा पोलीस ठाण्यातही अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करणाऱयांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दिल्लीच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोला बेपत्ता आणि शोषित मुलांच्या राष्ट्रीय केंद्राकडून काही लैंगिक शोषणाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे प्राप्त झाली होती. हे व्हिडिओ एकाने फेसबुकसह इतर सोशल मीडियावर पसरविले होते. त्यानंतर अशा प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना मिळाले आहेत.
त्यानुसार आता राज्यातील राज्यात विविध पोलिस ठाण्यात चाइल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.