बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
आनंद गल्ली, मच्छे येथील दोघा भावंडांवर क्षुल्लक कारणावरून चाकूहल्ला केल्याच्या आरोपावरून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली.
मतिन फैयाज मुजावर (वय 21, रा. मच्छे) असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी मतिनला अटक केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.
सोमवार दि. 28 मार्च रोजी दुपारी आनंद गल्ली, मच्छे येथील अक्षय पालेकर व अभिषेक पालेकर या दोघा भावंडांवर क्षुल्लक कारणावरून चाकूहल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी त्याचदिवशी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मतिनला अटक केली आहे.