पोलीस भरती प्रक्रियेतील फसवणुकीचा प्रकार, तिघा जणांविरूद्ध एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
पोलीस भरती प्रक्रियेत अनेक गैरप्रकार सुरूच आहेत. कधी प्रश्न पत्रिका फुटते तर कधी एकाच्या नावाने दुसराच परीक्षा लिहितो. आता तर शारीरिक चाचणीत भलताच उमेदवार भाग घेतला असून भरती मात्र दुसऱयाची झाली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर येथील मार्केट पोलीस स्थानकात तिघा जणांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने एकच खळबळ माजली आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयातील साहाय्यक प्रशासकीय अधिकारी मनोज मधुकर लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लक्ष्मण वेंकन्ना होसकोटी (रा. कळ्ळीगुद्दी, ता. गोकाक), आनंद जोगी (रा. धारवाड), सचिन गुग्गरी (रा. घटप्रभा) या तिघा जणांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण होसकोटी या तरुणाने पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण केली असून त्याची भरतीही झाली आहे. 26 फेब्रुवारी रोजी तो पोलीस दलात रुजू होण्यासाठी आला. त्यावेळी अधिकाऱयांनी त्याच्या संबंधीची कागदपत्रे पडताळली. शारीरिक चाचणीच्यावेळी प्रत्येक उमेदवाराचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाते. अधिकाऱयांनी व्हिडीओ पाहिले असता जो उमेदवार शारीरिक चाचणीसाठी हजर होता तो भलताच असल्याचे उघडकीस आले.
ज्या लक्ष्मण होसकोटी याची पोलीस दलात भरती झाली आहे तो शारीरिक चाचणीत हजर नव्हता. हा प्रकार उघडकीस येताच त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याने उर्वरित दोघा जणांची नावे सांगितली. त्यामुळे येथील मार्केट पोलीस स्थानकात तिघा जणांवर भा.दं.वि. 120(बी), 202, 416, 417, 419, 420, 465, 468, 471 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलीस भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. तरीही गैरमार्गाने भरती होण्याचे प्रकार सुरूच आहेत. खास करुन गोकाक तालुक्मयात असे प्रकार वाढीस लागले आहेत. लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणीही गोकाक तालुक्मयातील अनेकांना अटक झाली आहे.