अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 10 नोव्हेंबर, सकाळी 10.15
● गत 24 तासात 3018 संशयितांच्या चाचण्या
● जिल्ह्यात 34 नवे रुग्ण वाढले
● दिवाळी संपली…पर्यटन स्थळे बहरली
● थंडीचा कडाकाही वाढतोय
● सातारा तालुक्यात 11 नवे रूग्ण
● इतर 8 तालुक्यात एक अंकी वाढ
● महाबळेश्वर, पाटण तालुका निरंक
सातारा / प्रतिनिधी :
गत सात दिवसात दिपावलीचा उत्साह आणि कोरोना रूग्णांचा घसरता आलेख हा योगायोग जुळून आला. याच काळात कोरोना चाचण्यांची संख्या दीड हजारांच्याही खाली आली होती. मात्र सात दिवसानंतर चाचण्यांची संख्या पुन्हा तीन हजारावर गेली आहे. गेल्या 24 तासात 3018 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून 34 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
सातारा 11 तर कोरेगांव 6 रूग्ण
जिल्ह्यात 24 तासात जे 34 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. त्यामधे सातारा तालुक्यात 11 रूग्ण आढळले आहेत. कोरेगांव तालुक्यात 6 रूग्ण आढळले आहेत. जावलीत 1 तर कराडला 3 रूग्ण आढळलेे. खटावला 1, माणला 4, फलटण 4, वाई 2 तर इतर 2 रूग्ण आढळले आहेत. महाबळेश्वर, पाटण तालुक्यात एकही रूग्ण आढळलेला नाही.
दिवाळीनंतर पर्यटनस्थळे बहरली
जिल्ह्यात दिवाळीनंतर पर्यटन स्थळांवरील गर्दी चांगलीच वाढली आहे. महाबळेश्वर, वाई, पाटणसह जिल्ह्याच्या इतर भागात पर्यटनासह देवदर्शनासाठी गर्दी लक्षवेधी ठरत आहे. दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरणातील बदलामुळे लहान मुलांच्यात सर्दी, खोकल्याचे आजार वाढल्याचे रूग्णालयातील गर्दीवरून दिसते. वाढत्या थंडीत व्यायासाठी बाहेर पडणारांची संख्याही वाढली आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,47,175
एकूण बाधित 2,51,550
कोरोनामुक्त 2,43,946
एकूण मृत्यू 6,449
सक्रीय रुग्ण 290
मंगळवारी जिल्हय़ात
बाधित 34
मुक्त 188
मृत्यू 02, उशिरा नोंद 01