चीनची तँग रौप्य तर अमेरिकेची सिमोन बाईल्स कांस्य मानकरी
चीनच्या गुआन चेन्चेनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये मंगळवारी बॅलन्स बीमचे सुवर्ण जिंकत एकच धक्का दिला. तँग क्झिजिंगने रौप्य जिंकल्यामुळे या इव्हेंटमध्ये चीनच्या खात्यावर दोन पदके नोंद झाली. पुनरागमन करत असलेल्या अमेरिकेच्या सिमोन बाईल्सला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
जागतिक स्तरावरील सर्वोत्तम जिम्नॅस्ट म्हणून वाखाणल्या गेलेल्या सिमोन बाईल्सने यापूर्वी मागील मंगळवारी पहिल्या व्हॉल्टनंतर अचानक स्पर्धेतून माघार घेतली होती. मानसिक स्वास्थ जपण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे ती म्हणाली होती. मात्र, आता बॅलन्स बीम इव्हेंटमध्ये कांस्य जिंकत बाईल्सने आपण ट्रकवर परतत असल्याचा दाखला दिला.
यापूर्वी रिओ 2016 ऑलिम्पिकमध्ये देखील बाईल्स हिने या इव्हेंटमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. बाईल्ससाठी टोकियो गेम्समधील हे दुसरे पदक ठरले. यापूर्वी सांघिक इव्हेंटमध्ये तिने रौप्यपदकाची कमाई केली आहे. बाईल्सच्या खात्यावर आता 2 स्पर्धांमध्ये 7 ऑलिम्पिक पदके असून त्यात 4 सुवर्ण, 1 रौप्य व 2 कांस्यपदकांचा समावेश आहे.