चंबा शहराखालून 440 मीटर लांबीचे भुयार
वृत्तसंस्था / देहरादून
उत्तराखंडमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ) पथकाला मोठे यश हाती लागले आहे. बीआरओच्या पथकाने चारधाम प्रकल्पांतर्गत चंबा शहराखालून 4410 मीटर लांबीचे भुयार निर्माण केले आहे. हे भुयार ऑस्ट्रियन तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. या भुयाराचे निर्मितीचे काम ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु आता हे कार्य तीन महिन्यांपूर्वीच यशस्वीपणे पूर्ण केले जाणार असल्याची माहिती चीफ लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी दिली आहे.
या भुयारामुळे ऋषिकेश-धरासू महामार्गावर वाहनांची ये-जा अधिक सुलभ होणार असल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी मंगळवारी ट्विट करत सांगितले आहे. याचबरोबर गडकरी यांनी बीआरओचे अभिनंदन केले आहे.