वृत्तसंस्था/ चार्लस्टन
पुढील महिन्यात येथे होणाऱया सांघिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेची सोफिया किनेन आणि बियान्का अँड्रेस्क्यू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 16 महिला टेनिसपटूंचा सहभाग राहील.
सदर स्पर्धा 23 जूनपासून खेळविली जाणार असून ही स्पर्धा बंदीस्त टेनिस कोर्टवर प्रेक्षकविना होणार आहे. अमेरिकेच्या किनेनने 2020च्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे तर कॅनडाच्या अँड्रेस्क्यूने 2019 साली अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. चार्लस्टन सांघिक महिला टेनिस स्पर्धेत बेलारूसची अझारेंका, स्टीफेन्स, अमेरिकेची ऍनीसिमोव्हा, मोनिका प्युएग, जेनीफर ब्रॅडी, कॉलिन्स, नेव्हारो, रिसेकी, रॉजर्स भाग घेणार आहेत.