ऑनलाईन टीम / पॅरिस :
पॅरिस येथील प्रसिद्ध नियतकालिक चार्ली हेब्दोच्या जुन्या कार्यालयाजवळ झालेल्या चाकूहल्ल्यात 4 जण जखमी झाले आहेत. त्यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फ्रान्सचे पंतप्रधान जिन कॅस्टेक्स यांनी माध्यमांना दिली आहे.
पॅरिसवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याने या घटनेची दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीने तपासणी केली जात आहे. चार्ली हेब्दोच्या 11 डिस्ट्रिट ऑफ सेंट्रल पॅरिस येथील कार्यालयाजवळ हा हल्ला झाला. मागील महिन्यात चार्ली हेब्दोने पुन्हा एकदा मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र प्रकाशित केले होते. त्यामध्ये ‘इतिहासाचे पुनर्लेखन करता येणार नाही किंवा तो इतिहास पुसला जाऊ शकत नाही,’ असेही म्हटले होते. त्यामुळे अल-कायदाने चार्ली हेब्दोला पुन्हा एकदा 2015 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
चार्ली हेब्दोला दहशतवादी हल्ल्याची भीती असल्याने सध्याच्या कार्यालयाच्या पत्ता सुरक्षेच्या कारणावरून गुप्त ठेवण्यात आला आहे. 2015 साली चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 17 जण ठार झाले होते. त्यामध्ये संपादकीय विभागाचे 12 सदस्य, तिन्ही हल्लेखोर आणि 2 अन्य व्यक्तींचा समावेश होता.