प्रतिनिधी / सातारा :
ग्राहकांनी ऑनलाईन मागवलेले मोबाईल 4 डिलिव्हरी बॉयने परस्पर लांबवल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण निवृत्ती धिवर, प्रतिक कायगुडे, आकाश कृष्णांत डांगरे आणि फारुख मुजावर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महादेव सुरज गोटे याने दिलेल्या फिर्यादीनुसार आयडेंटी फाय प्लस डिलेव्हरी सर्व्हीसेस या कंपनीच्या ऑफिसमध्ये ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तू आल्या होत्या. त्यामध्ये 17 हजार 999 रुपयांचा रेडमीचा मोबाईल, 26 हजार 999 रुपयांचा रेडमीचा जीटी मास्टर मोबाईल, 11 हजार 999 रुपयांचा पोको कंपनीचा 3 थ्री मॉडेलचा मोबाईल, 9 हजार 999 रुपयांचा रिअलमी कंपनीचा मोबाईल, 10 हजार 999 रुपयांचा रिअलमी कंपनीचा मोबाईल, 17 हजार 999 रुपयांचा रिअलमी कंपनीचा मोबाईल, ऍपल कंपनीचा 49 हजार 900 रुपयांचा मोबाईल, 8499 रुपयांचा रेडमी कंपनीचा मोबाईल, 12 हजार 499 रुपयांचा मोबाईल, असे 1 लाख 66 हजार 892 रुपयांचे मोबाईल या 4 डिलीव्हरी बॉयने चोरुन नेले असून याचा शोध वाई पोलीस करत आहेत.