प्रतिनिधी / पणजी :
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी पावसाने जोर वाढविला. येत्या दि. 3 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे.
राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मान्सून सक्रिय झालेला आहे. शनिवारी राज्यात मुसळधार पाऊस पाऊस पडेल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक 3.5 इंच पाऊस केपे येथे झाला. फोंडा, मडगाव, सांगे येथे प्रत्येकी 1.5 इंच, पेडणे, सांखळी, काणकोण येथे प्रत्येकी 1 इंच तर पणजीत केवळ 10 मि. मी. एवढी पावसाची नोंद झाली. पणजीत गेल्या 10 तासांमध्ये अर्धा इंच पावसाची नोंद झाली. राज्यात यंदाच्या मोसमात आतापर्यंत 93 इंच पाऊस झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस शतक गाठणार असे दिसतेय. यंदाच्या मोसमात आतापर्यंत 22 इंच जादा पाऊस झालेला आहे.