ऑनलाईन टीम/तरुण भारत
रशिया-युक्रेन युद्ध आणि देशातील निवडणूक झाल्यांनतर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर सतत वाढत आहेत. चार दिवसांत पेट्रोल-डिझेल तिसऱ्यांदा महागले आहे. सलग दोन दिवसांच्या दरवाढीनंतर काल, गुरुवारी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. पण आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा ८० पैशांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून इंधनाच्या दरात वाढ झाली नव्हती. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननुसार, आज देशाची राजधानी दिल्लीत ८० पैशांची वाढ झाल्यानंतर एक लीटर पेट्रोलची किंमत ९७.८१ रुपये झाली आहे. तर डिझेल ८९.०७ रुपयांनी विकत आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्यानंतरपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नव्हते. त्यानंतर मंगळवारपासून तेलाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नव्हती. यानंतर गेल्या मंगळवारपासून तेलाच्या दरात वाढ होऊ लागलीय. दोन दिवस भाव वाढवल्यानंतर, तेल कंपन्यांनी तिसर्या दिवशी दरात कोणतीही वाढ केली नव्हती. मात्र, आता चौथ्या दिवशी तिसऱ्यांदा तेलाच्या दरात पुन्हा 80 पैशांनी वाढ झालीय.