वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेत तयार झालेली लस बरीच महाग मिळू शकते. फायनान्शियल टाईम्सने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील ‘मॉडर्ना’ ही कंपनी आपल्या एका लसीला 3,700-4,500 रुपये घेण्याची योजना आखत आहे. ही कंपनी आपली लस अमेरिका आणि अन्य मित्र देशांना पुरवणार आहे. आमची अमेरिकन सरकारसोबत लसीबद्दल चर्चा सुरू आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांनी गोपनियतेमुळे लसीची अधिकृत किंमत जाहीर करण्यास नकार दर्शवला. ‘मॉडर्ना’च्या लसीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे आतापर्यंतच्या पाहणीत स्पष्ट झाले असून विषाणू मारण्यात आणि संसर्गही रोखण्यास ती उपयुक्त ठरत असल्याचा दावा करण्यात आला.